जिल्हा शल्य चिकित्सक

#

सिव्हिल सर्जन ही जिल्हा स्तरावरील आरोग्य विभागातील एक महत्त्वाची व्यक्ती असते.

डॉ. विक्रमसिंह भा. कदम
जिल्हा शल्य चिकित्सक, सांगली

महाराष्ट्रामध्ये सिव्हिल सर्जन हे जिल्हा आरोग्य यंत्रणेचे एक महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. ते जिल्ह्यातील आरोग्य सेवांच्या गुणवत्ता आणि कार्यक्षमतेसाठी जबाबदार असतात. वेळोवेळी शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे सिव्हिल सर्जन पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माध्यमातून यासाठी परीक्षा घेतली जाते. सिव्हिल सर्जन हे केवळ एक पद नाही, तर ती जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेची धुरा सांभाळणारी एक महत्त्वाची जबाबदारी आहे. ते जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतात आणि आरोग्य सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांचे प्रमुख: सिव्हिल सर्जन हे जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे प्रमुख असतात. रुग्णालयांचे व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांची नियुक्ती व त्यांच्या कामाचे पर्यवेक्षण, रुग्णांना योग्य उपचार मिळतील याची काळजी घेणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी असते. आरोग्य सेवांचे नियोजन व अंमलबजावणी: जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवा कशा प्रकारे पुरविल्या जातील याचे नियोजन करणे आणि त्या योजनांची अंमलबजावणी करणे हे सिव्हिल सर्जनचे महत्त्वाचे काम आहे. यामध्ये विविध आरोग्य कार्यक्रम, लसीकरण मोहीम, साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवणे इत्यादींचा समावेश होतो.

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नियंत्रण व मार्गदर्शन: जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी (Medical Officers) सिव्हिल सर्जन यांच्या नियंत्रणाखाली काम करतात. सिव्हिल सर्जन त्यांचे कामकाज पाहतात आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शन करतात.

जिल्हा ग्रामीण रुग्णालये व त्यांतील डॉक्टर्स व कर्मचारी

15

एकूण रुग्णालये

137

एकूण डॉक्टर्स

497

एकूण कर्मचारी

नियमित अधिकारी व कर्मचारी

41

डॉक्टर्स

341

कर्मचारी

राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील अधिकारी व कर्मचारी

96

डॉक्टर्स

156

कर्मचारी

जिल्ह्यांतर्गत ग्रामीण रुग्णालयांची वैशिष्ठे

#

जिल्ह्यांतर्गत ग्रामीण रुग्णालयांची वैशिष्ठे एका दृष्टीक्षेपात पहा.

तज्ञ व अनुभवी डॉक्टर्स

जिल्हा ग्रामिण रुग्णालयांत सर्व प्रकारच्या रुग्णांच्या उपचारांसाठी तज्ञ व अनुभवी डॉक्टर्स सेवाभावी वृत्तीने कार्यरत असतात.

अत्याधुनिक व अद्ययावत उपचार पद्धती

जिल्हा ग्रामिण रुग्णालयांत रुग्णांच्या उपचारांसाठी अत्याधुनिक व अद्ययावत उपचार पद्धतींचा उपयोग केला जातो.

अत्याधुनिक व अद्ययावत वैद्यकीय उपकरणे

जिल्हा ग्रामिण रुग्णालयांत रुग्णांच्या उपचारांसाठी अत्याधुनिक व अद्ययावत वैद्यकीय उपकरणे उपलब्ध आहेत.

स्वतंत्र चिकित्सा विभाग

जिल्हा ग्रामिण रुग्णालयांत रुग्णांसाठी सर्व प्रकारच्या आरोग्य उपचारांसाठी स्वतंत्र चिकित्सा विभाग आहेत.

अद्ययावत वैद्यकीय तपासणी सुविधा

जिल्हा ग्रामिण रुग्णालयांत रुग्णांसाठी सर्व प्रकारच्या अद्ययावत वैद्यकीय तपासणी सुविधा उपलब्ध आहेत.

तत्पर व प्रभावी सेवा

जिल्हा ग्रामिण रुग्णालयांत रुग्णांना तत्पर व प्रभावी सेवा देण्यासाठी अत्यंत सेवाभावी वृत्तीने काम केले जाते.

स्वस्त किंवा मोफत उपचार

जिल्हा ग्रामिण रुग्णालयांत मोफत अथवा अंत्यंत माफक दरात उपचार केले जातात.

असंख्य आनंदी व समाधानी रुग्ण

जिल्हा ग्रामिण रुग्णालयांतून लाखो रुग्णांनी समाधानकारक उपचार घेतले आहेत.

अत्यावश्यक व तातडीच्या मदतीसाठी संपर्क करा


सांगली जिल्हा ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय सेवा मदत केंद्र क्रमांक :
0233 - 2970393

सांगली जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये

#

सांगली जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांची विस्तृत माहिती प्रत्येक रुग्णालयाच्या स्वतंत्र पेजवर जाऊन पहा.

जिल्ह्यांतर्गत ग्रामीण रुग्णालयांतील सुविधा

#

जिल्ह्यांतर्गत ग्रामीण रुग्णालयांतील सुविधांचा आढावा घ्या.

वैद्यकीय तपासणी

क्ष-किरण(एक्स रे),इसीजी,सोनोग्राफी,रक्त लघवी तपासणी

रुग्णालयातील वैद्यकीय विभाग

बाह्यरुग्ण विभाग,आंतररुग्ण विभाग, वैद्यकीय तपासणी प्रयोगशाळा, क्ष-किरण विभाग ,शस्त्रक्रिया विभाग, शित शवागृह, दंत चिकित्सा, कान नाक घसा चिकित्सा, नेत्र चिकित्सा, औषध वितरण विभाग, शवचिकित्सा तपासणी, अस्थीरोग, बालरुग्ण, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, हिमोफिलीया सेंटर,आयुष विभाग

रुग्णालयातील इतर सुविधा

डायलिसिस सुविधा, रुग्णवाहिका, ब्लड बँक, जनरेटर, सेंट्रल ऑक्सिजन लाईन, P.S.A प्लांट,L.M.O प्लांट, फायर एक्सिट सुविधा, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे व उपचार पद्धती, हर्बल गार्डन

रुग्णालयातून दिली जाणारी प्रमाणपत्रे

अंपग तपासणी व प्रमाणपत्र, दिव्यांग दाखले, मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र, वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र, जन्म दाखले, वयाचे दाखले, शव चिकित्सा तपासणी प्रमाणपत्र, जनुकीय तपासणी प्रमाणपत्र

रुग्णालयातील विविध उपचार व योजना

आयुषसुविधा-आयुर्वेदिक, होमिओपॅथी उपचार, प्रसुतीनंतरची आरोग्य सेवा, मोफत डायलिसिस सुविधा, गरोदरमाता तपासणी, प्रसुतीनंतरची आरोग्य सेवा, रुट कॅनल उपचार, ० ते १६ वयो गटातील लहान मुलांचे व गरोदर मातांचे लसीकरणे, महात्मा फुले जनआरोग्य योजना, जननीसुरक्षा योजना, कुटुंबकल्याण योजनाअंतर्गत मोफतउपचार, आकस्मित रुग्ण तपासणी, उपचार, संदर्भसेवा,अत्यावस्थ रुग्ण तपासणी, उपचार, संदर्भसेवा

रुग्णालयांच्या आपत्कालीन तात्काळ सेवा




ब्लड बँक

रुग्णवाहिका

अपघात मदत

नेत्र पेढी


जिल्हा स्तरीय वैद्यकीय क्षेत्रातील ठळक बातम्या व घडामोडी

#

जिल्हा स्तरीय वैद्यकीय क्षेत्रातील ठळक बातम्या व घडामोडींचा आढावा घ्या.

#
3 Mar, 2025

आरोग्य योजनांचा लाभ देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे.

मुंबई, दि. ७ : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शुभारंभ करण्यात आलेल्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी आरोग्य विभागाने सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

#
3 Mar, 2025

आरोग्य योजनांचा लाभ देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे.

मुंबई, दि. ७ : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शुभारंभ करण्यात आलेल्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी आरोग्य विभागाने सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

#
3 Mar, 2025

आरोग्य योजनांचा लाभ देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे.

मुंबई, दि. ७ : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शुभारंभ करण्यात आलेल्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी आरोग्य विभागाने सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.